सकाळी ऑफिसला जातांना वाटेत पाऊस सुरु झाला..पाऊस तसा रिम-झिम च होता....पण कपडे ओले होतील या धाकानं.....मी एका शाळेच्या आडोश्याला उभा राहिलो..... पण काही मिनिटातच पावसानं जोर धरला...आणी..मी शाळेच्या व्हऱ्यांड्यात उभा राहिलो......बाहेर धो धो बरसणारया पावसाचा आवाज एकत् उभं असलेलं माझं मन......क्षणार्धात शाळेच्या किलबिलाटा कडे ओढलं जावू लागलं.....शाळेच्या वर्गा-वर्गातून येणारा आवाज मला हळू हळू.....भूत काळाकडे ओढत होता.....कुठे ''बे-एक-बे चे पाढे ''.... तर कुठे ''श्रावण मासी हर्ष मानसी'' ची कविता....तर कुठल्या तरी वर्गात मुलांचा नुस्ता ''कल्ला'' मला उभ्यानच माझ्या बालपणात घेवून जात होता.....मनात आठवणींचा गोंधळ आणी शरीरावर डोक्यावरून पडणाऱ्या पावसाच्या थेंबानी..मी.......हरखून गेलो होतो......वर्गातून येणारा आवाज....शिक्षकांचे ओरडणे....मधेच टाळ्यांचा आवाज.....भूतकाळाच्या या....जंजाळात...अडकतो न अडकतो....तोच....अचानक भानावर आलो.......शाळेची घंटा घणघणत होती.......कदाचित मधली सुट्टी झाली होती.....अचानक...सगळ्या वर्गातून.....पक्ष्यांचे थवे च्या थवे उडावे तसे विद्यार्थी बाहेर येवू लागले..... क्षणार्धात सारा व्हरांडा मुलांनी गजबजून गेला......कोणी इकडे पळतोय तर कोणी तिकडे .....बहुतेक मधल्या सुट्टीत ''डबा'' खायची लगबग असणार त्यांना......माझ्या भोवती हि काही मुलांनी गराडा घातला ....मी मुद्दामच थोडा बाजूला सरकून उभा राहिलो......काही मिनिटातच संपूर्ण व्हरांडा हा मांडीवाळून अन गटा गटानं बसलेल्या मुला मुलींच्या घोळक्यांनी भरून गेला.....माझ्या शेजारीच ४-५ मुलांनी अंगत पंगत सुरु केली होती...कदाचित ४-५वी तील मुलं असतील....?? पटापट...पायांनच बसायची जागा साफ केली......आप आपले चप्पल बूट बाजूला काढून मांडी मारून बसली....प्रत्येकान आपल्या जवळील डब्बा हातात आणला होता, सगळ्यांनी आपले डब्बे उघडले.......डब्ब्या-डब्या तील ''खाऊ'' चा खमंग वास मला पुन्हा बालपणा कडे घेवून जात होता........निरागस -निष्कपट अन सहज असलेलं बालपण आणी बालपणातील 'मैत्री' या डब्ब्या तील 'खाऊ'तूंनच सुरु होते अन कदाचित ती चिरकाल टिकतेही.....निदान स्मरणात तरी नक्कीच राहते...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा